Featured
- Get link
- X
- Other Apps
The slum princes Maleesha kharwa. कोण आहे मालिषा खारवा ?,
The slum princes Maleesha Kharwa. कोण आहे Maleesha Kharwa?
Maleesha Kharwa मुंबई ही एक मायानगरी आहे. मुंबई मध्ये रोज हजारो लोक स्री आणि पुरुष नशीब अजमायला येत असतात.आणि भरपूर जनानची भरपूर कष्ट करण्याची ही तयारी असते.पण प्रत्येकाला त्यात यश येईल च असे नाही.यात काही आबद होतात तर काही बरबाद होतात.काही मुंबईतच राहतात तर काही परत गावी जातात.पण मुंबई सर्वांना भुरळ घालते.कारण इथे पैसा आहे, शान आहे,स्वप्न आहे,आकांक्षा आहे.अशी ही मुंबई कधी कोणाला भरपूर देते तर कोणाला काहीच देत नाही.पण अस म्हणातात की मुंबईत कोणीच उपाशी झोपत नाही.अशा स्वप्न नगरी त नशीब चमकल आहे एका झोपडपट्टीत राहणाऱ्या मलिशा खरवा च. जी अवघी १५ वर्षाची आहे.कोण आहे मलीशा खारवा.
मालिशा ही बांद्रा मध्ये राहते जो धारावी झोपडपट्टीचा भाग आहे .ती तिच्या आईवडील आणि चुलत्या सोबत राहत आहे.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम. पी. एस गजधर पार्क माध्यमिक शाळेतील दहावीची विद्यार्थिनी आहे.
कशी बनली international model:-
प्रसिद्ध हॉलिवूड स्टार रॉबर्ट हापमन जेव्हा २०२०मध्ये भारतात त्याच्या अल्बम च्या शूट साठी भारतात आला होता.तेव्हा त्याला त्याच्या एका मॉडेल ची आवश्यकता होती जी अक्टिंग आणि डान्स दोन्ही करू शकते.जेव्हा त्याने मलिषा ला पाहिले त्यावेळी त्याने तिला अल्बम साठी सेलक्ट केलं.तिचा निरागस चेहरा आणि आणि मोठे बोलके पाणीदार डोळे याने तो प्रभावित झाला.रॉबर्ट ने जेव्हा तिला विचारलं काय करणार आहे पुढे तेव्हा ती म्हणाली की तिला मॉडेल बनायचे आहे. तेव्हा तिचा मेकअप आणि मोडेलिंगला शोभेल असा get up करून फोटो काढले गेले.आणि instagram वर तिचे अकाऊंट सुरू करून अपलोड केलं तेव्हा तिचे भरपूर प्रमाणात फॉलोवर वाढत गेले.रॉबर्ट ने तिच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्राउड डोनेशन फंड पण चालू केला.ज्यात सोळा लाख रुपये जमा झाले.
slum princes जगात आता ती या नावाने ओळखली जात आहे.तिने एक शॉर्ट फिल्म मध्ये ही काम केले आहे.आता तिच्याकडे दोन हॉलिवूड प्रोजेक्ट असल्याचा बोलल जात आहे. Forrest essential जी ब्युटी प्रॉडक्ट बनवते ,तिला ब्रँड ॲम्बेसेडर ही बनवले आहे.
प्रसिद्ध फॅशन मॅगझिन cosmopolitan च्या front page वर ही ती ॲक्टरेस समीरा रेड्डी आणि सोशल influencer कुशा कपिला यांच्या सोबत झळकली.आणखी peacock मॅगझिन वर ही झळकली होती.
अस म्हणतात की देनेवला देता है तो छप्पर फाड के देता है जे बॉलिवूड मधील स्टार्स च्या मुलांना नाही जमल ते मलिशाने करून दाखवल.मालीशा इंग्लिश पण खूप छान बोलते तिचा आवडता विषय ही इंग्लिश आहे.
फॉरेस्ट एसेन्सिल या ब्युटी प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपनीच्या शो रूम्स मध्ये जेव्हा ती शाळेचा ड्रेस घालून गेली तेव्हा ती खूप खुश झाली.
आज तिचे insta वर अडीच लाखाच्या वर followers आहे.एका झोपडपट्टीतील मुलगी इतकं आकाशाला गवसणी घालू शकते.म्हणून तिला स्लम प्रिन्सेस या नावाने ओळखले जात आहे.
या यशाबद्दल महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी या यशाबद्दल तिचे कौतुक केले असता, एम.पी.एस गजधर पार्क शाळेच्या शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच येथपर्यंत पोहोचता आले आहे, अशी भावना मलीशा हीने व्यक्त केली.
मलीशा हीच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस बृहन्मुंबई महानगरपालिका पूर्णपणे सहकार्य करेल.
Popular Posts
२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा
- Get link
- X
- Other Apps
सुषमा अंधारे यांना मारहाण ? काय आहे सत्यता व viral video ...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment