Skip to main content

Featured

२०२३ ची ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा

 ४६२५ तलाठी भरती कुठे किती जागा पहा तुमच्या जिल्ह्याच्या जागा .... महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण - ४६२५ पदांच्या सरळसेवा भरती करीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालयाकडून दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (CBT computer base test) परिक्षा घेण्यात येईल.त्या रिक्त जागा तपशील खालील प्रमाणे असू शकतो. जागा कमी किंवा जास्त होऊ शकतात. आपल्याच जिल्हया मध्ये सरकारी नोकरी करण्यासाठी तयारीला लागा मित्रांनो संधी सोडू नका. करा अभ्यास सुरू. शुभेच्छा🎉🎉🎉🎊💐💐💐

इयत्ता १०वी चां निकाल ०२जूनला ?

 इयत्ता १०वी चां निकाल ०२जूनला ..!


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या मार्च २०२३ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचं निकाल शुक्रवार दिनांक ०२/०६/२००२३ रोजी दुपारी ०१:००वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे.


राज्यातून एकूण 15.77 लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून 533 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. माध्यमिक बोर्डने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये 84 हजार 416 मुले असून 73 हजार 62 मुली आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल 2023 मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. दहावीच्या मार्च – एप्रिल 2023 परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.

कसा पाहाल 10वी चा निकाल?

अधिकृत वेबसाइट — mahresult.nic.in वर लॉग इन करा.
महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 लिंकवर जा.
सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव.
लॉगिन करा आणि तुमचा 10 वीचा निकाल तपासा SSC Result
या संकेतस्थळावर जाऊन करू शकता शोध

http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.


Comments